जळगावमध्ये जामनेर नगरपरिषद निवडणुकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजनांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झालीय.महाविकास आघाडीच्या ज्योत्स्ना विसपुते यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. त्याचबरोबर शरद पवार गटाच्या उमेदवार प्रतिभा झालटे, काँग्रेसच्या उमेदवार रूपाली ललवाणी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.. त्यामुळे साधना महाजन यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झालीय.