जमिनीच्या वादावरुन गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात पुन्हा जुंपलीय.राष्ट्रीय महामार्गात एकनाथ खडसेंची भूसंपादित होत आहे.त्या जमिनीला भाव वाढवून द्या अशी मागणी एकनाथ खडसेनी विधान परिषदेत मांडला. तर वर्षभरापूर्वी खडसेंनी खरेदी केलेल्या जमिनीला भाव वाढवून देण्याची मागणी खडसेंनी केली त्याशिवाय विधान परिषदेत एकनाथ खडसेंचा दुसरा प्रश्न कुठलाही दिसला नाही असं महाजन म्हणाले होते.. तर गिरीश महाजनांच्या वडिलांचा जन्म झाला नसेल तेव्हापासून ही जमीन माझ्याकडे आहे असा टोला खडसेंनी लगावला.