Buldhana Farmer | बुलढाण्यात शेतीवर रोटावेटर फिरवण्याचा कार्यक्रम, शेतकऱ्याकडून कोणाला निमंत्रण?
Event involving the use of a rotavator on farmland in Buldhana; whom did the farmer invite?
संग्रामपूर तालुक्यातील काकोडा या गावातील गणेश मानखैर या तरुण शेतकऱ्याने २० एकर सोयाबीन पेरलं होतं....मात्र मध्यंतरी अतिवृष्टीमुळे या सोयाबीनवर रोगराई पसरली... त्यानंतर पावसाने जवळपास 45 दिवस खंड दिला व सोयाबीनला शेंगाच लागल्या नाही. त्यामुळे उद्विग्न होत या शेतकऱ्याने २० एकर सोयाबीन पिकावर रोटावेटर फिरवण्याचा निर्णय घेतला. सोयाबीनवर रोटावेटर फिरवण्याचा कार्यक्रम आयोजित करून या कार्यक्रमाला एका व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री,दोन्ही उपमुख्यमंत्री, दोन्ही पालकमंत्री, जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच आवाहन केलं आहे.