वर्धा जिल्ह्याच्या वाघोली जिल्हा परिषदेच्या शाळेतील एकोणपन्नास विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. शाळेमध्ये कडधान्य आणि खिचडी खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली. एकोणपन्नास विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जिल्हा परिषद वाघोली शाळेतील प्रकारानं चांगलीच खळबळ उडाली. तब्बल एकोणपन्नास विद्यार्थ्यांना सुरुवातीला कडधान्य आणि खिचडी खाऊन त्रास झाला.