तिकडे शिवसेना ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या सामनामधनं वेळोवेळी सरकार वरती आणि महायुतीवरती टीकेचे बाण सोडले जायचे मात्र सामनानं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच चक्क स्तुतिसुमन उधळली आहेत सामनातनं देवेंद्र फडणवीसांवरती कौतुकाचा वर्षाव झालाय गडचिरोलीमध्ये संविधानाचं राज्य येत असेल तर मुख्यमंत्री फडणवीस कौतुकास पात्र आहेत असं सामनानं म्हटलंय