Indore-Hyderabad महामार्ग शेतकऱ्यांचा रास्ता रोको, लोहारखेडा फाट्यावर भुयारी मार्ग करण्याची मागणी

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील लोहारखेडा फाट्यावर शेतकरी आणि ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केलंय.इंदोर हैदराबाद महामार्गावरील लोहारखेडा फाट्यावर भुयारी मार्ग करावा अशी मागणी शेतकरी आणि ग्रामस्थांनी केलीय.गेल्या दोन 2 तासापासून शेतकरी- ग्रामस्थांनी महामार्ग अडकल्याने इंदूर हैदराबाद महामार्गावर 5 किलोमीटर पर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा लागल्या असून, जोपर्यंत सक्षम अधिकारी आंदोलन स्थळी येऊन ठोस आश्वासन देत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा शेतकरी व ग्रामस्थांचा पवित्रा घेतलाय.

संबंधित व्हिडीओ