NCP विलिनीकरणाच्या चर्चेत जे नव्हते, त्यांना काय माहिती?, अनौपचारिक चर्चेवेळी शरद पवारांचं विधान

राज्यात एकीकडे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत राजकारण सुरु असताना, शरद पवारांनी एक मोठं विधान केलंय...विलीनकरणाच्या चर्चेत जे नव्हते त्यांना बैठकीबाबत काय माहिती असणार?...शरद पवारांनी अनौपचारिक चर्चेदरम्यान सवाल विचारलाय.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देखील विलीनकरणाची चर्चा फेटाळताना अजित पवारांनी आपल्याशी अशी कोणतीही चर्चा केलीच नव्हती असा दावा केला होता...तसंच मागील दोन दिवसांपासून विलीनीकरणाच्या चर्चा सुरूच नव्हत्या... असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांकडून दावा करण्यात येत होता, याला शरद पवारांनी उत्तर दिलंय..

संबंधित व्हिडीओ