मुंबईतील नामांकित क्लब आणि स्पोर्ट्स संस्थांमधील अन्नसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या धडक कारवाईत मुंबईतील पाच नामांकित क्लबचे FSSAI परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत. तपासणीत अस्वच्छ स्वयंपाकगृहे, झुरळे-माशांचा प्रादुर्भाव, मुदतबाह्य अन्नपदार्थांची साठवण आणि अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आढळून आले. या कारवाईमुळे मुंबईतील प्रतिष्ठित क्लबच्या व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे... दरम्यान, पुढील तीन दिवस एमआयजी क्लबची खानपान सेवा बंद राहणार आहे.. अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईनंतर स्वयंपाक घरातील स्वच्छता आणि इतर नियमांची पूर्तता करण्यासाठी तीन दिवस रेस्टॉरंट बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलीय..