मुंबई महापालिकेत वाहन खरेदीचा मुद्दा पुन्हा चर्चेत, पालिका नेत्यांचा आता Innova Crysta साठी हट्ट

मुंबई महापालिकेत वाहन खरेदीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. काही महिन्यांपूर्वीच नेत्यांसाठी खरेदी करण्यात आलेल्या नव्या स्कॉर्पिओ गाड्या आता नेत्यांना नकोशा झाल्या आहेत. धक्के बसतात आणि पाठदुखीचा त्रास होतो, या कारणावरून इनोव्हा क्रिस्टा गाड्यांची मागणी करण्यात आली आहे. सभागृह नेते, उपमहापौर, विविध समित्यांचे अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेत्यांसाठी नव्या वाहनांच्या खरेदीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, यामुळे पालिकेच्या तिजोरीवर पुन्हा लाखो रुपयांचा भार पडणार आहे.

संबंधित व्हिडीओ