25 ऑगस्टपासून Instagram वर बंदी येणार? PIB नं काय केलं आवाहन

सर्वसामान्यांसाठी सर्वात मोठी बातमी... कारण इन्स्टाग्राम बंद होणार आहे.. तशी पोस्टच सोशल मीडियावर फिरतेय.. 25 ऑगस्ट 2026 च्या रात्रीपासून भारत सरकार इन्स्टाग्रामवर बंदी घालणार आहे. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहनसुद्धा या पोस्टमध्ये करण्यात आलं होतं. मात्र ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर इन्स्टाग्रामवर अवलंबून असलेल्यांची चिंता वाढली होती. त्यावर आता केंद्र सरकारनेच स्पष्टीकरण दिलंय. हा दावा पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा आहे. इन्स्टाग्रामवर भारतात बंदी घालण्याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. सरकारच्या PIB फॅक्ट चेक युनिटनेही हा दावा फेटाळून लावला आहे. तेव्हा इन्स्टाग्राम बंद होणार ही माहिती पूर्णपणे चुकीची असल्याचं समोर आलंय.

संबंधित व्हिडीओ