जेजुरीत भंडाऱ्याचा भडका होऊन त्यामध्ये काही जण भाजल्याची घटना घडली आहे. जेजुरीत मतमोजणी पार पडून निकाल जाहीर झाल्यानंतर गडाच्या पहिल्या पायरीजवळ खंडेराया चरणी भंडारा अर्पण करून आशीर्वाद घेताना फटाके वाजत होते सोबतच भांडार उधळत होते. फटाके वाजत असताना भंडाऱ्याचा भडका होऊन त्यामध्ये सुमारे १६ जण भाजले असल्याची माहिती आहे. यामध्ये आताच निवडून आलेल्या नगरसेवकांचा देखील समावेश आहे. ही घटना दुपारी घडली घटनेत भाजलेल्या जखमींना खाजगी व सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुन्हा एकदा भेसळी युक्त भंडाऱ्याचा प्रश्न जेजुरी मध्ये ऐरणीवर आलाय.