नवी मुंबई विमानतळावरून येत्या 29 मार्चपासून देशातल्या आणखी सहा शहरांसाठी विमान सेवा सुरू होणार आहे. इंडिगो कंपनीमार्फत सुरू होणाऱ्या या फेऱ्यांद्वारे अहमदाबाद, दीव, गोवा, राजकोट, बेळगाव आणि कोल्हापूर ही शहरे नवी मुंबईशी जोडली जाणार आहेत. दरम्यान, 'इंडिगो'ने फेब्रुवारीच्या सुरुवातीला मोठ्या आकाराच्या विमान सेवांमधील काही अडचणींमुळे कोपनहेगनला जाणारी उड्डाणे अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहेत. तर दिल्ली ते मँचेस्टर आणि लंडनला जाणाऱ्या विमानफेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत.