नागपुरातील गणिताच्या पेपरफुटी प्रकरणात नवी माहिती समोर आलीय.पेपर फोडल्याचे तांत्रिक तपासात समोर आलंय.. पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाईलच्या डिलीट केलेला डेटा रिकव्हर केला आहे.. या रिकव्हर केलेल्या डेटामधून गणिताचाही पेपर फोडल्याची माहिती समोर आलीय.मात्र या पेपर फुटीचा मुख्य सूत्रधार अजूनही पोलिसांच्या हाती लागला नाही, या पेपरफुटीच्या तपासासाठी पोलिसांनी एसआयटी स्थापन केली असून मुख्य सूत्रधार हाती लागल्यावरच अनेक प्रश्नांचा उलगडा होणार आहे,