Jalgaon जि.प कर्मचाऱ्यांचे 4 ते 5 दिवसांपासून कामबंद आंदोलन, कामकाज ठप्प; प्रशासकीय कामे रखडली

जळगाव जिल्हा परिषदेतील शासकीय आणि निमशासकीय लिपिक श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे विविध विभागांतील दैनंदिन कामे रखडली असून प्रशासकीय कामांसाठी जिल्हाभरातून येणाऱ्या नागरिकांची ही मोठी गैरसोय होत आहे. वेतनातील त्रुटी तात्काळ दूर कराव्यात, जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी तसेच इतर प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी सुमारे 300 हून अधिक लिपिक श्रेणीतील कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे या आंदोलनाचा थेट परिणाम जिल्हा परिषदेच्या विविध शाखांच्या कामकाजावर झाला असून कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जिल्हा परिषद कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. याबाबत आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी.

संबंधित व्हिडीओ