आशा सेविकांना आरोग्यसेविकेकडून मारहाण?, बैठकीला बोलवून मारहाण केली, आशा सेविकांचा आरोप

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातल्या फेकरी येथे आशा सेविकांना बैठकीला बोलवून आरोग्य सेविकेने मारहाण केल्याचा गंभीर आरोप अशा सेविकांनी केला असून या घटनेच्या निषेधार्थ आशा सेविकांनी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या मांडून मारहाण करणाऱ्या आरोग्यसेविकेचे तात्काळ निलंबन करण्याची मागणी केली आहे. आशा सेविकांकडून आरोग्य सेविका पैसे मागत असून पैसे न दिल्याच्या कारणांनी ही मारहाण झाल्याचा आरोप आशा सेविकांनी केला आहे.

संबंधित व्हिडीओ