Western Railway AC Local Train | रेल्वेचा गारेगार प्रवास, पश्चिम रेल्वे मार्गावर 133 एसी लोकल धावणार

पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर व्हावा, यासाठी पश्चिम रेल्वेने वातानुकूलित लोकलची संख्या वाढवून १३३ वर नेली आहे. त्यात शनिवार आणि रविवारी १०६ वातानुकूलित लोकल धावतील. १२ नव्या वातानुकूलित लोकल जानेवारीत सुरू झाल्या असून फेब्रुवारीत त्यात आणखी १२ फेऱ्यांची भर पडली आहे. या लोकलला प्रवाशांकडून सातत्याने सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितलं.

संबंधित व्हिडीओ