सर्वसामान्यांसाठी मुंबई ठाण्यातनं केवळ सतरा मिनिटात नवी मुंबई एअरपोर्ट आता गाठता येणार आहे. हाय स्पीड वॉटर टॅक्सी तनं प्रवाशांचा हा सुसाट प्रवास होणार आहे. वॉटर टॅक्सी प्रकल्प वास्तवात उतरवण्यासाठी सध्या यंत्रणांकडनं काम सुरु आहे. एकीकडे मुंबई नवी मुंबई दरम्यानचा प्रवास आणखी गतिमान होणार असला तरी सामाजिक कार्यकर्ते आणि अभ्यासकांनी मात्र वॉटर टॅक्सी हा प्रकल्प यशस्वी होईल का? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. त्याचबरोबर सर्वसामान्यांना खिशाला परवडेल असा हा प्रकल्प असणार नाही त्यामुळे नाराजीही व्यक्त केली आहे.