भारत अमेरिका यांच्यातील व्यापार कराराच्या थांबलेल्या वाटाघाटींना आता नवा बुस्टर डोस मिळालाय.काल परवापर्यंत भारतावर जोरदार टीका करणारे ट्रम्प आज अचानक भारताशी मैत्रीचा राग आळवू लागलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी येत्या काही दिवसात संवाद साधण्याची भाषा करु लागलेत. त्याला भारतानंही सकारात्मक उत्तर दिलंय.पण एकेकाळी मोदी आणि ट्रम्प यांच्या मैत्रीची चर्चा जगभरात होती.. आता मात्र दोघांची मैत्री सोशल मीडियावर एकमेकांची स्तुती करण्यापुरती उरलीय का असा प्रश्न विचारण्याची वेळ आलीय.