Thackeray Brother's | ठाकरे बंधूंच्या भेटीत काय घडलं? MNS-Thackeray यांच्या युतीचा फॉर्म्यूला ठरला?

ठाकरे बंधू राजकीयदृष्ट्या एकत्र येण्याच्या दिशेने एक महत्वाची घडामोड घडलीय... राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आज दुपारी बाराच्या सुमारास उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंची भेट घेतली..दोघांमध्ये तब्बल अडीच तास बैठक पार पडली.. आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने पहिली औपचारिक चर्चा या भेटीदरम्यान झाल्याचं समजतंय. गेल्या 19 वर्षांतला विसंवाद आणि एकमेकांबद्दलचा अविश्वास दूर करण्याच्या अनुषंगाने ही बैठक महत्वाची मानली जातेय. तसंच येत्या 2 ऑक्टोबरला म्हणजे ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात ठाकरे गट आणि मनसेच्या युतीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. त्यामुळे त्याबद्दलही दोन्ही बाजुंच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि समर्थकांमध्ये उत्सुकता आहे.. शिवतीर्थवर पार पडलेल्या आजच्या बैठकीदरम्यान उद्धव ठाकरेंसोबत अनिल परब आणि संजय राऊत हे नेतेदेखील उपस्थित होते.. तर मनसेकडून बाळा नांदगावकरही या बैठकीच्या वेळी उपस्थित होते, अशी माहिती मिळतेय. विशेष दिवसांपूर्वीच गणेशोत्सवानिमित्त दोन्ही भावांची भेट झाली होती..तसंच त्यापुर्वीही काही वेळा हे दोन्ही बंधू विविध कार्यक्रमांमध्ये एकत्र आले होते...

संबंधित व्हिडीओ