सरकारनं पंजाब सरकार सारखी हेक्टरी 50 हजार मदत शेतकऱ्यांना करायला हवी होती अशी प्रतिक्रिया खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजवर दिली आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात पाहणी केली होती त्यांनी त्यांचे दुःख डोळ्यांनी पाहिलं होतं. मात्र सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसण्याच काम केल असून नुसती हजार कोटीची आकडे सरकार सांगत असून शेतकऱ्यांच्या पदरी या पॅकेजमधून निराशाच पडली असल्याची टीका धाराशिव चे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी मदत पॅकेजवर केली आहे.