Nagpur |दूषित Cough Syrup नं महाराष्ट्रातले मृत्यू नाही, डॉ. दीपक सेलोकर यांच्याशी बातचीत | NDTV

मध्यप्रदेशमधील छिंदवाडा जिल्ह्यातील काही लहान मुलांची प्रकृती बिघडल्याने त्यांना नागपूरच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. आतापर्यंत मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र असे मिळून १९ लहान मुलांचा मृत्यू झाल्याचे नागपूर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॅा दीपक सेलोकर यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रातील बालकांना दूषित कोल्ड्रिफ कफ सिरपचे सेवन झालेले नाही. मल्टिपल ऑरगन फेल्युअरमुळे या रुग्णांची मृत्यू झाल्याचे चौकशीत पुढे आहे आहे.या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी NCDC दिल्लीची टीम नागपूरला येणार आहे असे डॉ दिपक सेलोकर यांनी सांगितले आहे. यासंदर्भात नागपूर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॅा दीपक सेलोकर यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी .

संबंधित व्हिडीओ