मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! बहुप्रतिक्षित मुंबई मेट्रो-3 ची पहिली पूर्णपणे भूमिगत 'अॅक्वा लाईन' उद्यापासून (बुधवार) पूर्ण क्षमतेने सुरू होण्यास सज्ज झाली आहे. या महत्त्वाच्या टप्प्यामुळे आता कफ परेड ते आरेपर्यंत अखंड कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. या पहिल्या टप्प्यात विज्ञान केंद्र, महालक्ष्मी, CSMT, हुतात्मा चौक, आणि चर्चगेट यासह एकूण 11 भूमिगत स्टेशन्स प्रवाशांसाठी खुली होणार आहेत. या आधुनिक स्थानकांमुळे मुंबईचा उत्तर-दक्षिण प्रवास आता अधिक वेगवान आणि सोयीचा होईल.