प्रबोधनकार ठाकरे यांचे पुस्तक फेकल्याच्या घटनेवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक झाली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी हा प्रकार अत्यंत निषेधार्ह असल्याचे म्हटले आहे. पुस्तक फेकणाऱ्या व्यक्तीला 'प्रबोधनकार ठाकरे म्हणजे कोण आणि काय हे माहीत तरी आहे का?' असा सवाल करत त्यांनी, ज्यांनी कुणी हे केले ती व्यक्ती मूर्ख आहे, अशी टीका केली. यासोबतच खासदार संजय राऊत यांनी देखील या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.