प्रबोधनकार ठाकरे यांचे पुस्तक भेट देण्यावरून मोठा वाद उफाळला आहे. पुस्तक मिळाल्यावर हिंदू धर्माच्या विरोधात लिखाण असल्यामुळे आमच्या भावना दुखावल्या, असे मत परिचारिका शिष्टमंडळाने व्यक्त केले आहे. याप्रकरणी, राजेंद्र कदम यांच्या विरोधात नर्सिंग स्टाफने थेट हॉस्पिटल प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे. तब्बल ६५ नर्स आणि स्टाफने सह्या केलेले पत्र रुग्णालयाला दिले आहे. राजेंद्र कदम हे मागील दोन महिन्यांपासून सातत्याने कारवाईची धमकी देत असल्याचे परिचारिकांनी तक्रारीत म्हटले आहे.