मराठा-कुणबी आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काढलेल्या 'कुणबी' नोंदीसाठी असलेल्या शासन निर्णयाला (GR) अंतरिम स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. २ सप्टेंबर रोजी काढलेल्या या शासन निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना कोर्टाने हा निर्णय दिला. हायकोर्टाच्या या नकाराने राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.