Global News| Gujarat ATS, भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई; पाकिस्तानी Drugs तस्करीचा पर्दाफाश

गुजरात एटीएस आणि भारतीय तटरक्षक दलानं मोठी कारवाई केलीय. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांच्या पश्चिमेकडील परिसरात एका बोटीवर कारवाई करण्यात आली. या बोटीतून अमली पदार्थांची तस्करी करण्यात येत होती.एटीएस, तटरक्षक दलानं या बोटीला तातडीनं अडवून तिच्यावर कब्जा मिळवला आणि तपासणी केली तेव्हा त्यात ५२६ किलो उच्च प्रतीचं हेरॉईन आणि मेथामफ्टामाईनचा साठा आढळून आला. या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत अंदाजे ३ हजार कोटी असल्याची माहिती आहे. याप्रकरणी बोटीवरील पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आलीय. या कारवाईचा व्हिडिओ भारतीय तटरक्षक दलानं जारी केलाय. Global News | Major Operation of Gujarat ATS, Indian Coast Guard; Pakistani Drugs Trafficking Exposed

संबंधित व्हिडीओ