राज्य सरकारने जाहीर केलेल्या लाडली बहीण योजनेसाठी गेल्या दोन दिवसांपासून सेतू केंद्राच्या बाहेर मोठी गर्दी होताना पाहायला मिळते आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर सरकारने या योजनेत मंगळवारी काही बदल करण्याची देखील घोषणा केली. मात्र आज पुन्हा सेतू केंद्रावर सकाळपासूनच गर्दी होताना पाहायला मिळतेय. सेतू केंद्र उघडण्यापूर्वीच महिला सेतू केंद्राच्या बाहेर, जमताना दिसून येतायत.