Sangli Drought | जत तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची सरकारला सुबुद्धी यावी म्हणून अनोखी पूजा
A unique protest urging the government to see reason and declare Jat Taluka drought-affected.
तालुका दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी सांगलीच्या जत तालुक्यातील उटगी येथील कोरड्या तलावात थेट गणरायाला साकडे घालण्यात आले आहे. जत तालुक्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती गंभीर बनली आहे,अनेक तलाव कोरडे पडले आहेत,पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर बनला,त्यामुळे राज्य सरकारने तातडीने जत तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते व माजी सभापती तमनगौडा रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी थेट कोरड्या तलावात गणपतीची महाआरती केली आहे.