कुर्ला अपघात प्रकरणातील आरोपीला एकवीस डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणामुळे आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून कोर्टात सादर करण्याबाबतचा अर्ज पोलिसांनी कोर्टात दाखल केला होता मात्र कोर्टाने हा अर्ज फेटाळल्यानं आरोपी संजय मोरे ला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी कोर्ट बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता.