पाकिस्ताननं सिंधू जल कराराविषयी ठेवलेल्या प्रस्तावावर भारत कोणताही विचार करणार नाही अशी माहिती सरकारच्या उच्चपदस्थ सूत्रांनी एनडीटीव्ही मराठीला दिली आहे. सिंधू नदीच्या पाणी वाटपाविषयीच्या या करारावर आता कोणत्याही प्रकारे पुनर्विचार किंवा वाटाघाटी होणार नाहीत असंही भारतानं स्पष्ट केलंय. उलट ज्यात भारताचं हित आहे अशा प्रकारचं पाणी वाटप होईल असंही भारतानं निश्चित केलंय.