Ajit Pawar यांच्या अपघाताची चौकशी करा, निवृत्त न्यायाधीशाची नियुक्ती करा; महादेव जानकरांची मागणी

रासपचे नेते आणि माजी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातावर भाष्य केलं आहे. महाराष्ट्रातील 99 टक्के जनतेच्या मनात अजित दादांचा घात झाला ही शंका आहे. हे जर केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला स्वच्छ करायचं असेल तर केंद्र सरकारने याबाबत सीबीआयचे नेमणूक करून सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशाची नियुक्ती करून दूध आणि पाणी वेगळे करून जनतेच्या समोर सत्य आणावं. तुमच्या अहवालावरती जनता विश्वास ठेवायला तयार नाही. जे सत्य आहे ते बाहेर यावं एवढीच राष्ट्रीय समाज पक्षाची मागणी असल्याचं माजी मंत्री महादेव जानकर यांनी म्हटलं आहे...

संबंधित व्हिडीओ