पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकातील एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने पार पडले.उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.पुलाला अजित दादांचं नाव देऊ अस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.भाषण करताना फडणवीसांनी अजित दादांची आठवण काढली.पुल बांधण्याकरता अजित दादांनी पुढाकार घेतला.अजित दादांनी सगळ्यांना सोबत घेऊन पुल पडला आणि बांधला.दादांनी सर्वाना विश्वासात घेतले.सगळे एकत्र आल्यामुळे काम झाले.अशी भावना फडणवीसांनी व्यक्त केली आहे.तर उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळेल असं ही सांगितले.नव्यानेच लोकार्पण झालेल्या पुलावरुन आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी