एकीकडे नाशिक मध्ये आज रंगपंचमी साजरी केली जात असताना मात्र दुसरीकडे आज भारत विरुद्ध न्यूझीलंडचा क्रिकेटचा सामना देखील अहमदाबादच्या स्टेडियम वर पार पडणार आहे त्यामुळे नाशिककरांमध्ये आनंद द्विगुणीत झाला असून आम्ही दुपारपर्यंत रंगपंचमीची उधळण केल्यानंतर संध्याकाळी भारत विरुद्ध न्यूझीलंडचा सामना बघणार असून त्यामध्ये भारतचा विजय नक्की होईल असा देखील विश्वास नाशिककरांनी व्यक्त केला आहे याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे नाशिकचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी