Ratnagiri | Gas एजन्सीबाहेर सिलेंडरसाठी ग्राहकांच्या रांगा, याचदरम्यान ग्राहकांशी केलेली बातचीत

रत्नागिरी शहरामध्ये सकाळपासून गॅस वितरण करणाऱ्या एजन्सी बाहेर सिलेंडरसाठी ग्राहकांच्या रांगा पाहायला मिळताहेत.. युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसचा पुरवठा कमी होतोय किंवा गॅसचा तुटवडा भासेल, काही वेळेला सिलेंडर पोचवण्यासाठी एजन्सीकडून होत असलेला विलंब, गॅस बुक झाल्यानंतर देखील येणाऱ्या तांत्रिक अडचणी यासारख्या अनेक कारणांमुळे नागरिकांनी एजन्सीमध्ये येऊन सिलेंडर घेणे पसंत केले आहेत. आखाती देशातील युद्धामुळे गॅस पुरवठा कमी होणार अशी माहिती किंवा चर्चा सुरू असली तरी रत्नागिरी शहरासह जिल्ह्यात गॅस तुटवड्याची अधिकृत माहिती अद्याप नाहीय. मात्र 10 ते 15 दिवसांचं वेटिंग, बुकिंग होऊनही 20 ते 25 दिवस सिलेंडर न जाणे, आशा अनेक कारणांमुळे ग्राहकांनी गॅस एजन्सीमधून सिलेंडर घेऊन जाणं पसंत केलं आहे. त्यामुळे ग्राहकांच्या रांगा पाहायला मिळताहेत.. याचाच आढावा घेत ग्राहकांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी..

संबंधित व्हिडीओ