सुमारे सातशे ते आठशे वर्षाची परंपरा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले मठ येथील ऐतिहासिक संस्थानकालीन शिमगोत्सव आपली आज ही परंपरा जपतोय. मराठा व मुस्लिम यातील झालेल्या युद्धाचा क्षण हा घोडेमोडणी या खेळ प्रकारातून प्रतिकात्मक रित्या दाखविला जातो. यावेळी लाकडी घोडा घेऊन प्रतिकात्मक रित्या युद्धाचा क्षण होळीच्या खेळातून दाखविला जातो. रात्री चित्तथरारक असे आगीचे गोळे म्हणजेच बनाठे स्वतः भोवती फिरवत चित्तथरारक व सहसी खेळ खेळले जातात. असा आगळा वेगळा होळी उत्सव पाहायला मोठ्या प्रमाणात गर्दी असते.