Pune| शिरूरमधल्या चव्हाणवाडीत स्क्रॅपच्या गोडाऊनला भीषण आग, परिसरात काळ्या धुराच्या लाटा

शिरूर तालुक्यातील चव्हाणवाडी येथे असलेल्या स्क्रॅपच्या गोडाऊनला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत संपूर्ण गोडाऊन जळून खाक झाले असून परिसरात प्रचंड काळ्या धुराच्या लाटा पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.मिळालेल्या माहितीनुसार, गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक व इतर ज्वलनशील स्क्रॅप साहित्य साठवून ठेवण्यात आले होते. त्यामुळे आग लागल्यानंतर काही क्षणातच तिने भीषण रूप धारण केले. आगीमुळे आकाशात काळा धूर मोठ्या प्रमाणात पसरल्याचे नागरिकांनी सांगितले.घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

संबंधित व्हिडीओ