23 दिवस.. पश्चिम आशिया केवळ धुमसतो आहे... अमेरिका - इस्त्रायल आणि इराणचे परस्परांवर मिसाईल हल्ले सुरुच आहेत. असातच इराणनं इस्रायलला एक जोरदार झटका दिलाय. इराणनं डागलेलं एक मिसाईल इस्त्रायलमधल्या लिटिल इंडिया अशी ओळख असलेल्या डिमोना शहरावर कोसळलंय. त्यात 47 जण जखमी झालेत. महत्वाची बाब म्हणजे डिमोनात इस्त्रायलचं अणु संशोधन केंद्र आहे. पाहूया इस्रायलचं सर्वात सुरक्षित शहर असलेल्या डिमोना आणि अरादवर हल्ला करून इराणनं इस्रायल आणि पर्यायानं अमेरिकेला काय संदेश दिलाय तो..