राज्यभरात Petrol पंपांवर लांबच लांब रांगा, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियम लागू; नवे नियम काय?

इंधन संपणार अशी अफवा पसरल्याने राज्यात अनेक शहरांमध्ये भल्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. सामान्य लोक पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लावत आहेत. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडून आता निर्बंध लागू करण्यात आले आहेत.. दुचाकीसाठी 200 तर चारचाकींसाठी 2 हजारांचं पेट्रोल भरता येणार आहे. नागरिकांना कॅन बाटल्या किंवा ड्रम मध्ये इंधन देण्यासाठी सक्त मनाई करण्यात आली आहे. कोल्हापूर, हिंगोलीमध्ये प्रशासनाकडून तर रत्नागिरीत पेट्रोल पंप चालकांकडून तसे नियम करण्यात आले आहेत.

संबंधित व्हिडीओ