राज्यात भोंदूबाबा खरात प्रकरण सुरु असतानाच राजकारणातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आलीय. मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आलाय.या व्हिडिओनंतर काँग्रेसनेही नरहरी झिरवाळ यांची मंत्रीपदावरून तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे झिरवाळांचं मंत्रिपद धोक्यात आल्याची चर्चा आहे.. मंत्रालयातल्या लाचखोरी प्रकरणात याआधीच झिरवाळ अडचणीत आले होते. एसीबीच्या कारवाईनंतरही झिरवाळ तेव्हा वाचले होते. मात्र आता नव्या व्हिडिओमुळे झिरवाळांची अडचण वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर पक्षातून कारवाई होण्याची शक्यता आहे. नव्या वादग्रस्त व्हिडिओमुळे झिरवाळांना मंत्रिपदावरुन पायउतार होण्याची वेळ येणार का याची चर्चा सध्या सुरु आहे. यासंदर्भात NDTV मराठीने नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. मात्र झिरवाळांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.