पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जागेवरून सुरू असलेल्या रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांच्या वादाला आज नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे सांगण्यासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी थेट जैन बोर्डिंगमध्ये जाऊन स्पष्टीकरण दिले. दरम्यान, दिल्लीहून परतलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीतील नेत्यांमध्ये मिठाचा खडा पडू नये, याची काळजी प्रत्येकाने घ्यावी, असा स्पष्ट निरोप रवींद्र धंगेकर यांना दिला आहे. धंगेकरांनी मोहोळ यांच्यावर गुन्हे वाचून दाखवत पुन्हा निशाणा साधला आहे. हा वाद वाढू नये, यासाठी शिंदेंचा हा निरोप अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.