दिवाळीच्या काळात सर्वसामान्यांच्या हाताबाहेर गेलेल्या सोन्याचा दर लक्ष्मीपूजनानंतरच्या चार दिवसांत तोळ्यामागे ८ हजार रुपयांनी घसरला, तर चांदीच्या दरात किलोमागे ३८ हजार रुपयांची घट झाली. गेल्या आठ दिवसांत राज्यात १७०० कोटी रुपयांच्या सोन्याची खरेदी करण्यात आली. त्यात मुंबईचा वाटा ११०० कोटींचा होता.