उच्च शिक्षणाच्या नावाखाली देशभरातील विद्याथ्यांची फसवणूक करणाऱ्या बोगस विद्यापीठांवर विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) पुन्हा कारवाईचा बडगा उगारला आहे. आयोगाने मान्यता नसलेल्या विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे. त्यात देशभरातील २२ विद्यापीठांचा समावेश असून, त्यापैकी दिल्लीतील १०, तर महाराष्ट्रातील एका विद्यापीठाचा समावेश आहे. वारंवार निर्देश देऊनही या विद्यापीठांवर राज्य सरकारांकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याने 'यूजीसी' ने नाराजी व्यक्त केली आहे.