हिंगोलीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अगोदर हिंगोलीत महायुतीतील मित्र पक्षातील वाद चव्हाट्यावर आलाय.मित्र पक्ष जर म्हणत असेल की कोण उभं राहतं आणि कसं उभं राहतं.. तर असं चालणार नाही, आम्ही आहोत, म्हणून तुम्ही आहात हे मान्य करावे लागेल की नाही? भाजप नेते खासदार अशोकराव चव्हाण यांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा आलं अंगावर तर घेतलं शिंगावर एवढा कार्यक्रम करण्यासाठी भाजपवासियांनी तयार व्हा..असं आवाहन भाजप नेते खासदार अशोक चव्हाण यांनी भाजप कार्यकर्त्यांना केलं आहे.