पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन वादात आज 'गोड' आव्हान समोर आलं आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी थेट जैन बोर्डिंगला भेट देऊन जैन मुनींसमोर आपली बाजू मांडली आणि जैन बांधवांना न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. यानंतर शिवसेनेचे (शिंदे गट) नेते रवींद्र धंगेकर यांनी मोहोळांना खोचक टोला लगावला आहे. "जर मोहोळांनी खरोखर हे प्रकरण मार्गी लावलं आणि जैन बांधवांना न्याय मिळवून दिला, तर मी शनिवारवाड्यावर जिलेबी वाटप करेन" असं आव्हान धंगेकरांनी दिलं.