जळगावच्या परधाडे रेल्वे स्थानकाजवळ काल दुर्घटना घडली.. पुष्पक एक्स्प्रेसला आग लागल्याची अफवा पसरली.. त्यानंतर अनेक प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या... मात्र त्याचवेळी समोरून कर्नाटक एक्स्प्रेस येत होती.. या एक्स्प्रेसनं पुष्पक एक्स्प्रेसमधून उड्या मारलेल्या प्रवाशांना जोरदार धडक दिली.. यात जवळपास 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाकडून मिळतीय.. जखमी प्रवाशांवर शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरुये.. यात काही जण गंभीर जखमी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतीय..