सोशल मिडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना पहायला मिळाला.तो म्हणजे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा मुलगा आदित्यराज याचा आदित्यराजकडे अनेक टू व्हिलर- फोर व्हिलर vvip गाड्या आहेत. या गाड्या घेऊन तो रोडवर स्टंटबाजी करताना दिसतो. ही रोडवरची स्टंटबाजी तो शूट करतो आणि त्याचे तो रिल बनवून स्वताच्या अकाऊंटला टाकताना दिसतो. आता त्याचे हे स्टंट करतानाचे व्हिडिओ पाहिल्यावर नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तर अनेकांनी स्वताच्या अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करत राग व्यक्त करत मंत्र्यांसाठी कायदा वेगळा आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.