कल्याणमध्ये लैंगिक अत्याचार आणि हत्या झालेल्या मुलीवर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. मुलीच्या घरी तिचं पार्थिव आणण्यात आलेलं आहे. या परिसरामध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. मुलीच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.