मित्रांसोबत मस्ती करणे डोंबिवलीत एका महिलेच्या जिवावर बेतले आहे. डोंबिवलीतील विकास नाका परिसरात मस्तीमध्ये एका महिला तिसऱ्या मजल्यावर खाली पडल्याने तिचा मृत्यू झाला. या महिलेसोबत मस्ती करणाऱ्या बंटी नावाच्या तरुणाला कसेबसे लोकांनी वाचविले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मानपाडा पोलिसांनी सुरु केला आहे.