Nashik-Mumbai| गिरणा धरणाच्या पाणी पातळीत वाढ, दुसरीकडे मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली

मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी पातळीत वाढ झालीय.तानसा, विहार, तुळशी आणि मोडकसागर ही धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत. मध्य वैतरणा धरण देखील 81 टक्के भरलंय. तर उर्ध्व वैतरणा धरण 68 टक्के भरलंय... भातसा धरण देखील लवकरच काठोकाठ भरण्याची शक्यता आहे. कारण भातसा धरण देखील 82 टक्के भरलंय.मुंबई पाणीपुरवठा करणाऱ्या सध्याच्या घडीला 7 पैकी 4 धरणं ओव्हर फ्लो झाली आहेत. त्यामुळे मुंबईकरांची पुढील वर्षाची पाण्याची चिंता मिटली आहे.नाशिकच्या कळवण , सुरगाणा व सटाणा भागात बरसत असलेल्या पावसामुळे गिरणा आणि मोसम नदीतून मोठ्या प्रमाणावर पुराचं पाणी वाहत आहे...पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढल्याने खान्देशवासियांसाठी वरदान ठरलेल्या नाशिकच्या गिरणा धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होत आहे...धरणाची पाणी पातळी ७७.५६ टक्के झाली आहे...

संबंधित व्हिडीओ