Palghar जिल्ह्यात धरण फुटल्याची अफवा, अफवांवर विश्वास न ठेवण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

पालघर जिल्ह्यासह गुजरात सीमेवरील धरण फुटल्याची चुकीची माहिती आणि अफवा सोशल मीडियावर पसरविल्या जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्क राहून कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे...जिल्ह्यातील कुर्झे धरण तसेच गुजरातमधील धरण फुटल्याची खोटी माहिती सर्वत्र पसरवली जात असून,नागरिकांनी अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन करण्यात आलं आहे.

संबंधित व्हिडीओ